December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद कृतज्ञता

कल्याण

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभरव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने १०० सेकंद स्तब्ध उभे राहून पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अभिवादन करण्यात आले.

बुद्धिवान, कर्तबगार राजा म्हणून आपण छत्रपती शाहू महाराज यांना ओळखतो. त्यांनी त्या काळात धरण बांधून घेतली. सर्व धर्मीय मुलांसाठी आश्रम शाळा तयार केल्या. देशात पहिल्यांदा आरक्षणाचा पाया रचला. मराठा कुणबी मागास जातींना आरक्षण दिले. मुस्लिम मुलांसाठी आश्रम शाळा बांधली. दलित कांबळेला हॉटेल टाकून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुकनायक वृत्तपत्र काढण्यासाठी मदत केली. सर्व क्षेत्रात त्यांनी काम केले.

महाराज आपल्या कामा प्रति प्रामाणिक होते. त्यांनी लोकशाही रुजवली. शिक्षण मोफत केले. महिलांसाठी कायदे केले. पुनर्विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा पुण्यात स्थापित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सभेला सुरवात झाली.

या अभिवादन सभेत अनेकांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कामाचा गौरव केला. अनेकांनी त्यांच्या प्रसंगाच्या आठवणी सांगितल्या. शाहू महाराज यांच्या शताब्दी वर्षात वर्षभर कार्यक्रम करण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

अश्या कर्तबगार राजाला कल्याणमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अभिवादन करण्यात आले. त्या वेळी नेते अण्णासाहेब रोकडे, पत्रकार बाबा रामटेके, ऍड. घनशाम गायकवाड, गणेश अहिरे, एसबी गवई,सुहास कोते, कॉ. उदय चौधरी, हेमंत कांबळे, अक्षय गायकवाड, दिव्यांग नेता लक्ष्मण शिर्के, दयानंद खोलंबे आणि कार्यकर्ते यांनी १०० सेकंद उभे राहून कृतज्ञता अभिवादन केले.