December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

माय सिटी फिट सिटी : कल्याण व डोंबिवलीतील एक मार्गिका Cycling & Walking साठी खुली

कल्याण

“माय सिटी फिट सिटी” या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कल्याण रिंग रोडवरील गांधारे ब्रिज ते बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डोंबिवली येथील पत्रीपूल ते ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता हे दोन रस्ते आज पासून सकाळी ५ ते ८ या वेळेत महापालिका परिसरातील नागरिकांसाठी केवळ Cycling & Walking साठी खुले ठेवण्यात आले आहेत. या वेळेत या दोन्ही रस्त्यांवरील एका बाजूची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

माय सिटी फिट सिटी ही संकल्पना आपण नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचे ठरविले असून विशेषत: कल्याण व डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रस्ता सकाळी ५ ते ८ या वेळेत Cycling & Walking साठी उपलब्ध करून दिला आहे, Cycling & Walking करताना वाहनांची ये-जा चालू असल्यास सातत्याने एक प्रकारचे मानसिक दडपण राहते, त्यामुळे हे रस्ते सकाळच्या वेळेत राखीव ठेवले आहेत, नागरिकांच्या सूचनेनुसार व आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांच्या मदतीने आणखी काही रस्ते Cycling & Walking साठी राखीव ठेवले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळी ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावर बोलताना दिली.

नागरिकांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा उद्देशाने महापालिकेने आज सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे, असे मत यावेळी उपस्थित सायकलपटूंनी व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवलीतील नगरीतील वाहतूक कोंडी आणि पर्यायाने प्रदूषण कमी व्हावे, यादृष्टीने महापालिका परिसरात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी राबविलेल्या या उपक्रमाचे वेळी आज भल्या पहाटे स्वतः आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचेसह त्यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, महापालिका सचिव संजय जाधव, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, अतुल पाटील, स्वाती देशपांडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता व्ही. एस. पाटील, रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, डोंबिवलीतील वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गीते, उपअभियंता जितेंद्र शिंदे, जितेंद्र पाटील महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, प्रभागातील सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, राजेश सावंत, सविता हिले, क्रीडा अधिकारी मुकणे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच अनेक सायकलपटू उपस्थित होते.

या उपक्रमासाठी महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, महापालिका सचिव संजय जाधव आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले.