December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

बुलेटवाल्या पोलीस नाईकाची सतर्कता

कल्याण

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्याला रांगेत येण्यास सांगणाऱ्या मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराला पोलीस नाईकच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले आहे. मॅनेजरच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी हल्लेखोर शहाबाज रफिक शेख (२६, रा. रोहिदास वाडा, कल्याण) याला अटक केली आहे. पोलीस नाईक हृषिकेश भालेराव यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

पश्चिम येथिल हिंद ऑटो मोबाईल्स नावाचे पेट्रोल पंपावर सुमारे ७ वर्षापासुन संतोष सिंग (३६) हे मॅनेजर या पदावर काम करतात. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सिंग नेहमीप्रमाणे काम करत होते. पेट्रोल पंपांवर दोनच पंप पेट्रोल भरण्याकरीता सुरू होते. दुपारी १२ च्या सुमारास पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा टॅकर आल्याने सिंग टाकीत पेट्रोल भरण्याचे काम करत होते. त्यावेळी, एक पंप तात्पुरता बंद केला होता. याच दरम्यान अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटाचा एक इसम पंपाच्या विरूध्द दिशेने पेट्रोल भरण्यासाठी आला व मोठयाने ओरडुन ” किधर है आदमी पेट्रोल डालो!” त्यास सिंगने “लाईन मे आओ तुम गलत दिशा से आए हो!” याचा राग आल्याने शहाबाजने मोटार सायकलचे खाली उतरून सिंगला मोठयाने शिवीगाळी करण्यास सुरूवात केली.
त्यास सिंग यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता शहाबाजने मोटार सायकलचे डीक्कीतुन कापडात गुंडाळलेला चाकु काढुन सिंग यांच्या पोटास लावुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सिंग त्यास प्रतिकार करत असतांना बुलेट घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक हृषिकेश भालेराव हे त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी सिंग यांना धमकी देणाऱ्या शहाबाजला पकडुन ठेवले. यावेळी, शहाबाजने भालेराव यांनी देखील धक्काबुक्की केली. सिंग यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मदतीसाठी फोन केला.

थोडयाच वेळात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस मदतीला आले. त्यानंतर त्यांनी सिंग यांना धमकी देणा-या शाहाबाजला त्याचेकडे असलेल्या चाकुसह व मोटार सायकलसह ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.