डोंबिवली
कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास संदप गावातील खदानीमध्ये घडली.
संदप गावासह आसपासच्या परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात.
आज सायंकाळच्या सुमारास देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घडली.
अपेक्षा गायकवाड (३०), मीरा (५५), मयुरेश (१५) , मोक्ष (१३), निलेश गायकवाड (१५) अशी मयताची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर