December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

@letsupp.app

थॅलेसेमियाला रोखण्यासाठी लग्नाआधी वैद्यकीय तपासण्या करणे हितकारक

 

जागतिक थॅलेसेमिया दिन

भारतामध्ये दरवर्षी नवीन १० हजार थॅलेसेमिया रुग्णांची भर

ठाणे

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित, जनुकीय विकार आहे. लाल रक्तपेशींमधील हीमोग्लोबिन, प्रथिन निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या जनुकांच्या कमतरतेमुळे किंवा जीन्समधील त्रुटींमुळे या आजाराची लागण होते. थॅलेसेमिया हा आजार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते, परंतु अनेक नागरिकांमध्ये याचे निदान शेवटच्या टप्प्यात होते जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतातील ४० दशलक्षाहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

भारतामध्ये विकसित शहरांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी दहा हजार पेक्षा जास्त मुले या आजाराने जन्माला येतात परंतु ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश केल्यास हि संख्या दुप्पट होऊ शकते कारण यापैकी यापैकी ५० टक्के रुग्ण गरीबी आणि वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे वयाच्या २० व्या वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतात. याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलचे हेमॅटोलॉजिस्ट डॉ. दीपकुमार महाजन सांगतात, “थॅलेसेमिया हा एक रक्तविकार आहे. यामध्ये मुलांच्या शरीरातील लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य पद्धतीनं होत नाही, सोबतच या पेशींचे आयुष्य देखील कमी असते. याच कारणामुळे मुलांना प्रत्येक २१ दिवसांनंतर कमीत-कमी एक युनिट रक्त देण्याची आवश्यकता असते.या आजारानं ग्रस्त असलेली मुले जास्त काळ जगू शकत नाही.काही मुले या आजारापासून बचावली तरीही त्यांना अन्य आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते. जर पालकांपैकी एक वाहक असेल तर मुलाला थॅलेसेमिया मायनर होतो. हा विकार असलेल्या लोकांमध्ये सहसा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, ज्यामुळे स्थिती ओळखणे कठीण होते. अशा प्रकारे पालक किंवा नातेवाईकांची चाचणी घेणे उचित आहे. थॅलेसेमियाचे इतर प्रकार म्हणजे अल्फा आणि बीटा. अल्फा थॅलेसेमियाच्या बाबतीत, अल्फा ग्लोबिन जनुकांपैकी किमान एक असामान्यता आहे. बीटा थॅलेसेमिया मध्ये बीटा ग्लोबिन जनुकांवर परिणाम होतो. प्रत्येक फॉर्ममध्ये उप-प्रकार आहेत, ज्याची लक्षणे व उपचार भिन्न आहेत. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. आई किंवा वडील या आजारानं ग्रस्त असल्यास त्यांच्या मुलांनाही हा विकार होऊ शकतो. यामुळेच खबरदारी म्हणून विवाहापूर्वी या आजाराशी संबंधित वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील धोके टाळले जातील. आईवडिलांमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे असली तरीही मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता अधिक असते. परिणामी मुलांमध्ये या आजाराची स्थिती गंभीर स्वरुपातील असू शकते.”

अवेर, शेयर व केयर हि आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनाची या वर्षांची थीम आहे म्हणजेच या आजाराबाबत सावध व्हा. महिती शेअर करा व काळजी घ्या अशी असून थॅलेसेमिया या आजाराच्या जागतिक प्रभावाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. थॅलेसेमिया केवळ आनुवंशिकतेने म्हणजेच जीन्सद्वारे पालकांकडून मुलांमध्ये जात असल्यामुळे त्याला रोखता येते. साध्या रक्त चाचण्यांमुळे जोडप्यांना थॅलेसेमिया किंवा इतर अनुवांशिक विकारांनी मुल होण्याचे धोके ओळखण्यात मदत होऊ शकते. या चाचणीला वाहक अनुवांशिक चाचणी म्हणतात. हा आजार असलेल्या जोडप्यानी डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणा करावी असे मत प्लॅटिनम हॉस्पिटलचे हेमॅटोलॉजिस्ट डॉ. दीपकुमार महाजन यांनी व्यक्त केले. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जनजागृती करणे आहे.