December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण पश्चिमेतील या भागात उद्या वीजपुरवठा बंद

कल्याण

वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (१२ मे) काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेशाद्वारे पूर्वसुचना देण्यात आली असून याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

२२ केव्ही दुर्गाडी उपकेंद्रातून निघणाऱ्या आधारवाडी फिडरवरील सोनावणे कॉलेज, वाडेघर सर्कल, साईबाबा मंदिर, अन्नपुर्णा नगर, जेलरोड, सहजानंद चौक फिडरवरील मोहिंदरसिंग काबुलसिंग, ठाणकरपाडा, दुर्गानगर, मानससरोवर, सुंदरनगर, महाराष्ट्र नगर, आग्रा रोड फिडरवरील आग्रा रोड, भारताचार्य चौक, लाल चौकी, पारनाका, नमस्कार मंडळ, बंदर रोड फिडरवरील रेतीबंदर, मिठबंदर, व्हाईट हाऊस, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोलीवाडा आदी भागाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तथापि संबंधित भागाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात इतर वाहिन्यांवरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर वाडेघर फिडरवरील आनंदसागर, डीबी चौक, श्री कॉम्लेक्स मेहरनगर, डॉन बॉस्को शाळा, वाडेघर, साई शरण आदी भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.