December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC निवडणूक : अंतिम प्रभाग रचना जाहीर

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना ही शासन राजपत्रामध्ये दिनांक १३ मे, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण ४४ प्रभाग संख्या करण्यात आली असून ९९७ हरकती पैकी ३७५ प्रशासनाने मान्य केल्याची माहिती निवडणूक उपायुक्त सुधाकर जगताप यानी दिली.

कल्याण डोबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ असून लोकसंख्येच्या निकषानुसार निवडुन द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १३३ इतकी आहे. सदरची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार होणार आहे. एकुण प्रभागांची संख्या ४४ असून तीन सदस्यांचे ४३ प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. (प्रभाग क्र. ४४) असणार आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १,५०,१७९ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२,५८४ इतकी आहे.

अनुसूचित जातीसाठी एकूण १३ जागा राखीव राहणार असून त्यापैकी ७ जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत.

अनुसूचित जमातीसाठी ४ जागा राखीव राहणार असून त्यापैकी २ जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत.

त्याच प्रमाणे सर्वसाधारण स्त्रीयांसाठी ५८ जागा राखीव राहणार आहेत. उर्वरित ५८ जागा या सर्वसाधारण असणार आहेत.

प्रभाग क्रमांक २८, २९, ३२, ३७, ३८, ४२ आणि ४३ यांच्या सिमांमध्ये बद्दल करण्यात आले आहे 

अंतिम प्रभाग रचना ही सर्व प्रभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर, महापालिका मुख्यालय व kdmcelection.com या संकेतस्थळावर आज दिनांक १३ मे रोजी नागरिकांच्या पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे.