December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन

कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी

कल्याण

एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये १९ ते २२ मे दरम्यान ‘प्रॉपर्टी एक्सो 2022‘ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, राजेश गुप्ता, रवी पाटील, रोहित दिक्षीत, संजय पाटील, अनिरुद्ध पाटील उपस्थित होते.

अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत ४० लाख रुपयांपासून ते दीड कोटी रुपये किंमतीची घरे आहेत. सीटी सेंटरीकमध्ये ही किंमत आहे. तर शहराच्या आऊट स्कर्टमध्ये २० लाखापासून घरे उपलब्ध आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत परवडणारी घरेही निर्माण केली जात आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी पाहावयास मिळत आहे.

एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा

राज्य सरकारकडून स्टॅम्प डय़ूटीच्या माध्यमातून एलबीटी कर वसूल केला जातो. तसेच मेट्रो सेसही वसूल केला जात आहे. ही कर वसूली बिल्डरांकडून केली जात असली तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे एलबीटी आणि मेट्रो सेस कर वसूली रद्द करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.