कल्याणपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर तसेच भिवंडीनजीक ठाणे नाशिक महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर लोनाड हे छोटस गाव आहे. याच गावात प्राचीन कालीन इ स सन ५ व्या शतकातील बौद्धकालीन चैत्य गुफा आहे.
कल्याणपासून उत्तर दिशेला गांधारी खाडीपलीकडे बौद्ध लेण्यांचा एक गट आहे. इ स सन ५ व्या शतकात कोकणचे मौर्य राजे यांची या भागावर सत्ता होती. त्याच काळात हे कोरण्यात आले असावे. हा गट सहाव्या किंवा सातव्या शतकातला असण्याची शक्यता आहे. लोनाड गावाच्या उत्तरेला पूर्वेकडे तोंड करून हि बौद्ध चैत्य गुंफा आहे. व अपूर्ण स्थितीतील दोन तळ घरे आहेत. उंच कठड्या सारखी पायवाट याठिकाणी जाते. याठिकाणी दुहेरी व्हरांडा आहे. एक सभागृह आहे व गाभारा अपूर्ण अवस्थेत आढळून येतो. या ठिकाणी असलेल्या व्हरांड्याची उंची साधारण ६३ फुट लांब व ९ फुट रुंद आहे. उंची ९ फुट आहे. ह्याच्या व्हरांड्याच्या टोकाला डाव्या कोपर्यात एक पाण्याचे कुंड आहे व उजव्या कोपऱ्यात पूर्ण आकाराच्या आकृती कोरल्या आहेत. त्या बसलेल्या स्थितीत असून ४ फुट उंचीच्या आहेत. आतला व्हरांडा तीन खांबांनी निराळा झाला आहे. चौकोनी खांब ३ फुट बाजूचे चौरसाकृती आहे व त्याची उंची साडे दहा फुट आहे. खांबाचे वरचे भाग सपाट व गोल आहेत.
खांबावर असलेल्या पट्टीवर मानवी आकृती खूपच कोशल्यपूर्णपणे कोरलेल्या आढळून येतात. असे असले तरी यातील काही आकृती ह्या विद्रूप झाल्या आहेत, आत मध्ये असलेला व्हरांडा हा ५० फुट लांब ९ फुट रुंद व ९ फुट उंच आहे. या ठिकाणी असलेल्या भिंती पूर्णपणे सपाट आहेत. या सभागृहात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. मधल्या दरवाजावर शिल्पकृती आढळून येते. छत पेलून धरण्यासाठी दोन हात उंच पसरल्याचे कोरीव काम याठिकाणी आढळते. आतमध्ये असलेले सभागृह साधारण ५० फुट लांब व १८ फुट रुंद व ११ फुट उंच आहे. पाठीमागे असलेल्या मधल्या भिंतीवर एक अपूर्ण मूर्ती आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक खांडेश्वरी देवी व दुसरी महिषासुरमर्दिनी अशा दोन मूर्ती आहेत.
व्हरांड्याच्या दक्षिण टोकाचा एक गट व कोरीव कामाचा पट्टा आहे. आतील बाजूस एक अतिशय सुंदर शिल्पचित्र आहे. एक राजा व त्याचे दरबारी लोक असून इतर सेवक व सेविका आहेत. मध्यभागी राजा सिंहासनावर बसलेला असून एक स्त्री त्याचा पाय चेपीत आहे. राजाच्या मागे उजवे बाजूस एक स्त्री तंतू वाद्य डाव्या हातात घेऊन बसलेली आहे व उजव्या हातात राजाची तलवार घेऊन बसली आहे. या स्त्रीच्या मागे स्त्री पुरुष सेवक म्हणून आहेत. एकाच्या हातात धुण्याचे भांडे व एकाच्या हातात फुले आहेत. राजाच्या मागील बाजूस एक स्त्री हा सर्व प्रकार कौतुकाने पाहत उभी असून तिच्या हातात चवरी आहे. अगदी डाव्या बाजूला एक स्त्री तिच्या हातात एक बटवा व उजव्या हातात पाण्याचे भांडे घेऊन उभी आहे. तर डाव्या बाजूला एक पुरुष तिच्या कान कुंडलाला स्पर्श करीत आहे खालच्या बाजूस दोन मंत्री बसलेले असून त्यांच्या वरच्या बाजूला एक स्त्री आहे. हा राजा चालुक्य घराण्यातील दुसरा पुलकेशी असण्याची शक्यता असून याने उत्तरेकडील हर्ष राजाचा पराभव केला व इ.स. ६२० नंतर या राजाने इराणचा राजा दुसरा ख्रुश्रू याजकडे आपला वकील पाठवला होता. म्हणून राजानेही पुलकेशीकडे परत आपला वकील पाठवला होता याचेच हे चित्र आहे. यात दरबारात इराणच्या राजाचा वकील आपल्या राजाकडून आणलेला खलिता राजस देत असल्याचे हे चित्रात दाखवले आहे. बहुधा या शिल्पा कृतीवरुनच अजंठा येथील चित्र तयार केल्याची अथवा त्याची नक्कल याठिकाणी केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.
सर्व फोटो संग्रहित…
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर