April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

…सावली साथ सोडते तेव्हा

कल्याण

‘शून्य सावली दिवस’ ही भौगोलिक घटना लहान-थोरांना अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे.

खेळ सावल्यांचा सर्वांनाच आनंददायी वाटतो. परंतु आपल्या आजूबाजूला खेळणारी सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते. हे कुतूहल अनुभवण्यासाठी, शून्य सावली दिवसानिमित्त एक मार्गदर्शनपर उपक्रम सोमवारी १६ मे २०२२ रोजी सुभेदारवाडा कट्ट्याने सकाळी ११:३० ते १२.३० दरम्यान सुभाष मैदान, अत्रे रंगमंदिर जवळ, कल्याण (प.) येथे आयोजित केला होता.

यावेळी गजानन विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या शिक्षिका स्मिता धर्माधिकारी, डोंबिवलीतील महात्मा गांधी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अंकुर आहेर, ईशिता पाठक, कट्ट्याचे संजय पांडे आदी उपस्थित होते.