December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

जलतरणपटू सूखजीत कौर

आंतरराष्ट्रीय भरारी घेणारी डोंबिवलीची जलपरी सूखजीत

डोंबिवली 

सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख. या शहराने क्रीडा क्षेत्रामध्ये ही उल्लेखनीय कामगिरी बजावली असून अनेक दिग्गज खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि संघटक या शहराने महाराष्ट्र आणि देशाला दिले. डोंबिवलीची जलपरी म्हणून ओळख असणाऱ्या सुखजीत कौर हिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य अनेक स्पर्धा मधून डोंबिवलीकरांची मान उंचावली असून सुखजीत ने 1986 मध्ये जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर पोलोमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली. या कालावधीत तिने अनेेक सूवर्ण पदके मिळवली आहेत.

गेली 40 वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना सूखजीतने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मजल मारली आहे. त्यामध्ये समुद्र जलतरण – 21 नॉटिकल मैल मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे ज्यात 1996 झ्युरिच या देशामध्ये महिला गटात कांस्य पदक जिंकले. मास्टर एक्वाटिक चॅम्पियनशिप हंगेरी 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 2010 स्वेसन मधील आणखी एक जलतरण चॅम्पियनशिप सिडनी 2010 मध्ये वर्ल्ड मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपचे प्रतिनिधित्व केले आहे.

समुद्रातील पोहण्याच्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सर्वात लहान पोहणारी म्हणून ही तिचा गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये हमला ते दादर बीच -36 किमी. संक रॉक टू गेटवे, रत्नागिरी, वेंगुलर, फॉरवर्ड ते वेरावळ, नेव्हल सेलिंग क्लब या सर्वांमध्ये हॅट्रिकसह भाग घेतला आहे. आजपर्यंत सुखजीत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लॉकडाऊननंतर पुनः नव्या जोमाने स्पर्धेला प्रारंभ केला. त्यामध्ये पहिल्या पॅन मास्टर्स चॅम्पियनशिप बेंगळुरू-2022 मध्ये 5 सुवर्ण पदके जिंकली.

सुखजितला युके मध्ये आगामी कार्यक्रम मिळाला असून कोणतेही प्रायोजकत्व नाही. सुखजित प्रत्येक पैसा स्वतःहून खर्च करत आहे. सुखजित काही कंपनी शोधत असून जी तिला आगामी कार्यक्रमांसाठी प्रायोजित करू शकेल. तिला वायले स्पोर्ट्स क्लबने सहकार्य केले आहे. त्यांनी तिला आगामी कार्यक्रमांसाठी प्रशिक्षण देण्याची परवानगी दिली आहे.

भारतासाठी आणि राज्यासाठी एवढे पदके जिंकून देखील शासनाने कुठेही दखल घेतली नसल्याची खंत सुखजित कौर हिने व्यक्त केली.