कल्याण
रेल्वे अधिकाऱ्याला लुटणाऱ्या त्रिकूटास आरपीएफच्या मदतीने कल्याण जीआरपीने अटक केली. घरी जाणाऱ्या रेल्वे अधिकारी चंद्रकांत कारंडे यांच्यासोबत हा प्रकार रेल्वे यार्डात घडला होता. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
मुंबई येथील वांद्रे येथील रेल्वेत कारंडे हे कामाला आहे. काल रात्री ते कामावरून पूर्वेतील काटेमानवली येथील आपल्या घरी परतत होते. रेल्वे यार्डात उभी असलेली दुचाकी घेऊन घरी जाण्यासाठी निघाले असता तीन जण त्यांच्या जवळ आले. चाकूचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्या जवळचा मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली.
कारंडे यांनी यावेळी आरडाओरडा सुरु केला. यार्डात कार्यरत असलेले आरपीएफ जवान आणि साध्या वेशातील पोलिस त्यांचा आवाज ऐकून मदतीला धावले. लूटून पळणाऱ्या तिघांना त्यांनी पकडले. आरोपींची नावे राहूल पवार, राहूल होरोले आणि दत्ता मंडलीक अशी आहेत.
या तिघांनी यापूर्वी कोणाला लुटले आहे का याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे अशी महिती कल्याण रेल्वेच्या महिला पोलिस अधिकारी अर्चना दुसाने यांनी दिली आहे.











Leave a Reply