December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Image/@Facebook

पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात

मुंबई 

महाराष्ट्र शासनाने 21 मे 2022 पासून पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली असून, दिनांक 21 मे 2022 पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत पेट्रोलवर प्रती लिटर 32 रुपये 90 पैसे ऐवजी 30 रुपये 82 पैसे इतका मूल्यवर्धित कर लागू होईल. तसेच, प्रती लिटर डिझेलवरील मूल्यवर्धित कर 22 रुपये 70 पैसे ऐवजी 21 रुपये 26 पैसे इतका असेल.

उर्वरित महाराष्ट्रासाठी दिनांक 21 मे 2022 पासून पेट्रोलवर प्रती लिटर सरासरी 32 रुपये 80 पैसे ऐवजी 30 रुपये 80 पैसे इतका मूल्यवर्धित कर लागू होईल. तसेच प्रती लिटर डिझेलवरील मूल्यवर्धित कर 20 रुपये 89 पैसे ऐवजी 19 रुपये 63 पैसे इतका असेल. सर्व ऑइल कंपनी आणि पेट्रोल पंप व धारक यांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी.

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील उपरोक्त केलेल्या मूल्यवर्धित कर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रतीवर्षी सुमारे दोन हजार चारशे कोटीचा भार पडणार आहे.