December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणमधील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

कल्याण

कल्याणमध्ये रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा समोर आला असून प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग या रिक्षाचालकाने परत केली आहे. हौशिला प्रसाद मिश्रा यांच्या रिक्षात अज्ञात प्रवासी महत्वाचे कागदपञे असलेली बॅग विसरले.

रिक्षाचालक मिश्रा यांनी रिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या जनसंपर्क कार्यालयात प्रवाशाची विसरलेली बॅग प्रामाणिकपणे जमा केली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी करत प्रवासी यांचा शोध घेऊन कुशल हरीराम कुमार यांचीच बॅग असल्याची खातरजमा करून त्यांना ती परत केली. कुशल कुमार यांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे आभार मानले.