December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

बोल्ड मीरा जोशी दिसणार ‘तारा’च्या निरागस भूमिकेत…

या लघु चित्रपटाबद्दल, काय भावना आहेत,

सांगतीये मीरा जोशी…

NCPIL च्या महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्या योजना प्रकर्षाने दर्शवणारा हा लघुचित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण म्हणजेच शुटींग तारापूर या वास्तविक गावात जाऊन केले आहे. तिकडच्या महिलांचे राहणीमान बोलण्या-चालायच्या पद्धती. हे सर्व अभ्यास करून बघून काम करण्यात खूप मजा आली. नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच गावातील काही नवीन मैत्रिणी मला मिळाल्या. खेडेगावा मधल्या बायका जे काही करतात ते प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला सुद्धा मिळाले.

ताराच्या निरागस भूमिकेत मीरा

मला एक किस्सा सांगावासा वाटतो तो म्हणजे, चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे, जिथे मला पाटावर बसून भांडी घासायची होती, तो सिन शूट करताना कधी माझी साडी पाण्यात भिजायची तर कधी लोळायची. नेहमी किचनमध्ये ओट्यासमोर उभे राहून भांडी घासायची सवय असल्याने फजिती झाली होती, यावेळी तिथल्या एका महिलेने मला प्रत्यक्षात शिकवलं कि कसं पाटवर बसायचं, कसं भांड धरायचं आणि घासायच…

हा चित्रपट म्हणजे एक भावनिक व हृदयस्पर्शी कथा आहे, व आपल्या सरकारची आहे, सरकारकडून नेहमीच समाज प्रबोधनाचे काम होत असते, मला सुद्धा या कामात खारीचा वाटा मिळाला याचा आनंद आहे.

या चित्रपटामध्ये एक प्रेरणादायी गाणं आहे जे शूट करताना आम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पेटला होता.

हा चित्रपट शिलाई मशीनवर आधारित असल्याने चित्रपटातील मुख्य पात्र असलेल्या ताराला शिलाई मशीन चालवता येणे आवश्यक होते. माझ्या घरी आईला मी लहानपासूनच मशीन चालवताना पाहिले होते. त्यामुळे त्याचे लहानपणापासूनच धडे मिळाले होते. त्याचा शूटिंगच्या वेळी खूप फायदा झाल्याचे मीराने सांगितले.

शिलाई मशीनवर काम करत असताना

या आधी शहरातील कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी किंवा व्हिलन असेच पात्र साकारले. माझा हा गावातील एक कार्यक्षम महिला साकारतानाचा पहिलाच अनुभव असल्याचे मीराने सांगितले.

निरागस, अतिशय मेहनती आणि नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी, काहीतरी स्वतःच्या स्वबळावर करून दाखवण्याची जिद्द असलेली अशी भूमिका पाहिलांदाच साकारायला मिळाली आणि हि भूमिका साकारताना मला खूप मजा आल्याचे मीरा सांगते.

सपनोंकी पाठशाला‘ या लघु चित्रपटाचे दिग्दर्शन अमृतेश श्रीवास्तव असून निर्माते दीपक शर्मा आहेत. कास्टिंग डायरेक्टर राज पांडे आणि प्रमुख भुमिकेत मीरा जोशी, सहअभिनेता मनीष शर्मा आहेत.

आपला नवरा गरीबीमुळे लोकांनी दिलेले जुने कपडे वापरतो, त्यांचेसाठी आपण नवीन शर्ट घेऊन द्यावा, असे छोटेसे स्वप्न मनात ठेऊन त्या दिशेने सरकारी NCPIL च्या योजनांच्या मदतीने पुढे मार्ग काढत जाणारी ही एक साधी गावातील निरागस महिला आणि तिची कहानी यावर आधारित हा लघु चित्रपट आहे.

हा लघु चित्रपट २९ मे २०२२ रोजी रात्री ७.५० वाजता आपल्या डीडी नॅशनल वर प्रदर्शित होणारा हा चित्रपट अवश्य बघावा असे आवाहन मीराने प्रेक्षकांना केले आहे.