अजिंठा फाउंडेशनने घेतली पालिका आयुक्तांची भेट
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिमेत असलेल्या माता रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली असून आज रमाईंच्या स्मृतीदिनी याबाबत अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी आधारवाडी ग्रामस्थ आणि कल्याण शहरातील नागरिक उपस्थित होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यास मोलाची साथ रमाईची लाभली. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अंत्यत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी संसार करत असताना देशाची हजारो वर्षाची पंरपरा जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी मोलाचे कार्य केले. शाहू महाराजांनी माता रमाई यांना यांना बहिण मानली होती. छत्रपती शाहू महाराजांनी माता रमाई यांचे कौतुक करायचे.
त्यामुळे आजच्या पिढीला, स्त्रियांना येणा-या पिढीला माता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर रहावा यासाठी माता रमाई आंबेडकर उद्यानात माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी अजिंठा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आपण पुतळा रस्त्याच्या दुतर्फा लावत नसून उदयानाच्या आत दर्शनी भागी लावावा. यासाठी आर्थीक निधीची कमतरता असल्यास आम्ही लोक वर्गणीतून निधी महानगरपालिकेकडे जमा करण्यास तयार आहोत. माता रमाईंचा पूर्णाकृती पुतळा जिल्हात कुठेही नाही. त्यामुळे आपल्याकडे झाल्यास त्याचे महत्त्व वाढेल व आदर्श घडेल अशी प्रतिक्रिया यावेळी अजय सावंत यांनी व्यक्त केली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर