December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पार्टी दरम्यान गुन्हेगाराचा पोलिसावर चाकू हल्ला

कल्याण

मी याला ओळखतो, तीन वेळा याला उचलायला याच्या घरी गेलो आहे असे बोलणाऱ्या पोलिसावर गुन्हेगाराने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दीपक देशमुख असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्यात एक महिला सुद्धा जखमी झाली आहे.

पश्चिमेत राहणारे देवेंद्र शास्त्री आणि कल्याणमध्ये कार्यरत पोलिस कर्मचारी दीपक देशमुख यांच्यात मैत्री आहे. काल रात्री शास्त्री यांच्या घरी एक छोटेखानी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला शास्त्री यांनी देशमुख यांना देखील बोलावले होते. पार्टी सुरू असताना शास्त्री यांचा मित्र सुनिल काळे त्यांच्या घरी आला. या दरम्यान, शास्त्री यांनी काळेची ओळख देशमुख यांच्याशी करुन दिली. यावेळी, देशमुख यांनी एक वॉरंटबाबत विषय काढला. हा विषय काढताच काळे आणि देशमुख यांच्यात वाद झाला. या वादातून काळे याने देशमुख यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला.

या दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शास्त्री यांच्या पत्नीच्या हाताला मार लागला आहे. देशमुख यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हल्ला करुन पसार झालेल्या काळेचा बाजारपेठ पोलिस शोध घेत आहे.