December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्यावतीने बिझनेस ग्रोथ प्लान कॉम्पिटीशन

कल्याण

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या उद्योजक विकास प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत समाजातील बेरोजगार युवक-युवतीना उदयोजक विकास प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमातील नव- उदयोजिक युवा-युवतींसाठी दे आसरा, देशपांडे फाउंडेशन आणि लाईट बॉक्स यांच्या सहकार्याने बिझिनेस ग्रोथ प्लान कॉम्पिटीशन भरविण्यात आली होती. यात जयपूर, म्हैसूर, महाराष्ट्र येथुन २६ नव उद्योजकांनी भाग घेतला होता. विजयी उद्योजकांना रोख रक्कमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मॅजिक बसचे सीईओ जयंत रस्तोगी यांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रविणा कुकडे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन भीमराज पवार व संतोष शेळवले यांनी केले. या कार्यक्रमात महात्मा फुले विकास महामंडळाचे अनिल सानप तसेच आय.डी.बी.आय, बँकेचे मॅनेजर रंजन आहिरे यांनी देखील आपला सहभाग नोंदवला व नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.