महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश
कल्याण
कोविड काळात केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला आशा सेविकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कोविड काळात केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदल्या पासून केडीएमसी क्षेत्रातील आशा सेविका वंचित होत्या. वारंवार पाठपुरावा करून देखील हा मोबदला मिळत नसल्याने या आशा सेविकांनी राष्ट्रीय मजदुर कॉग्रेस (इंटक) महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघ इंटक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र किशोर खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते कोणार्क देसाई यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत कार्यरत आशा सेविका यांनी आज कामबंद आंदोलनला सुरु केले.
त्यांच्या या कामबंद आंदोलनाची दखल पालिका प्रशासनाने घेत कोविड काळात केलेल्या सर्वेक्षणाचे प्रति दिन ३५० रु महानगरपालिका आशा सेविकांच्या खात्यात जमा करणार असे लेखी आश्वासन महापालिका आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी सघंटनेला देण्यात आले. त्यामुळे आशा सेविकांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सर्व आशा सेविकांनी कामगार नेते कोणार्क देसाई यांचे आभार मानले असून आजच्या बंदमध्ये ११० आशा सेविकांचा सक्रिय सहभाग होता. गटप्रवर्तक स्वाती सरोदे, मनिषा खाने, रेणुका घरत, महाराष्ट्र राज्य सचिव विक्रम राठोड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष फाईज मुल्ला यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर