April 18, 2025

news on web

the news on web in leading news website

दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूची मदत

कल्याण

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने नेरुळ जिवन ज्योती आशालय या अनाथश्रमात जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. यावेळी दुर्गा फाऊंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा शोभा भोईर, नवी मुंबई सचिव रसिका म्हाञे, पडघे अध्यक्षा श्वेता पाटील, रायगड उपाध्यक्षा कविता शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण समाजाचे काही तरी देणे, लागतो या सदभावनेने दर एक दोन महीन्यातुन गरजूंना दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने मदत केली जात असल्याची माहिती दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा शोभा भोईर यांनी दिली.