कल्याण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे सदर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
बुधवारी १ जून रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून आरक्षणाबाबत हरकती व सूचना (महापालिका आयुक्त यांच्या नावाने) बुधवार दिनांक १ जून २०२२ ते सोमवार दिनांक ६ जून २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महापालिका भवन, तळमजला, शंकरराव चौक, (कल्याण पश्चिम) अथवा संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू