कल्याण
गेली ५१ तास पाणी नसल्याने एमआयडीसी निवासीसह आजूबाजूच्या गावातील त्रस्थ नागरिक आपल्या मागण्या घेऊन एमआयडीसी कार्यालयावर आज धडकले. कार्यकारी अभियंता रमेश पाटील हे रजेवर असल्याने सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर, आणि कनिष्ठ अभियंता निलेश भोपाळे यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्विकारले.
नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्यानंतर आणि दिलेल्या निवेदनातील मुद्दे यांची उत्तरे धामापूरकर यांनी दिली. त्याची पूर्तता पुढील काही दिवसांत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसे ते लिखित स्वरूपात काही दिवसांत कळवणार आहेत.
या मोर्चाला ७५ हून अधिक नागरिक सुट्टीचा दिवस नसतानाही तर काहींनी कामावर दांडी मारून उपस्थिती लावली होती. खास करून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या मोर्चात राजु नलावडे, नंदू परब, धर्मराज शिंदे, भालचंद्र म्हात्रे, विवेक देशपांडे, संजय चव्हाण, विनय तटके, करिश्मा प्रताप, प्रिया व आनंद दामले, सतीश पाटील, कर्नल (निवृत्त) सी.आर. देशपांडे, निखिल कुलकर्णी, किरण भोसले, बेबीताई पाटील, संध्या सराफ, निर्मला मानकर, अजय देसाई, गंगा चंद, उदयसिंग सुर्वे, मुकुंद वैद्य, राजु देवरासकर इत्यादी नागरिक उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर