कल्याण
कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार आधिनियम २०০९ व नियम २०११ अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५ % जागांवर आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु झाली आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून दुस-या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात फेरीमधील प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या बालकांच्या दिनांक १९ मे पासून सुरु असून प्रवेश निश्चितीसाठी अॅलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची तपासणी प्रक्रीयेकरिता दि. २७ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, आता प्रतिक्षायादीतील बालकांच्या प्रवेश निश्चिती प्रक्रीयेसाठी दिनांक ३ जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या www.student. maharashtra.gov.in/adm portal/Users/rteindex या RTE PORTAL वर त्यांच्या लॉगीनमध्ये अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. या अॅलोटमेंट लेटर व प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पड़ताळणी समितीकडून दिनांक ३ जून पर्यंत मुदतीत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी आर. टी. जगदाळे यांनी केले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर