December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसीची महिला आरक्षण सोडत जाहीर

कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी महानगरपालिकेच्या कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या निकषानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून दयावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 133 इतकी आहे. ही निवडणूक बहुसदस्‍यीय प्रभाग पध्दतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 44 असून 3 सदस्यांचे 43 प्रभाग व 4 सदस्यांचा 1 प्रभाग आहे. अनुसुचित जातीसाठी 13 जागा राखीव राहणार असून आजच्या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या एकूण 13 जागांपैकी 7 अनुसूचित जातीच्या महिलांकरिता सोडत काढण्यात आली, अनुसूचित जमातीकरीता राखीव असलेल्या 4 जागांपैकी अनुसूचित जमातीच्या महिलांच्या 2 जागांसाठी आज सोडत काढण्यात आली आणि उर्वरित 116 सर्वसाधारण जागांपैकी 58 जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत त्यापैकी 42 जागा निवडणूक आयोगाकडून थेट आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 15 जागांसाठी सर्वसाधारण महिलांकरिता सोडत काढण्यात आली आणि प्रभाग क्रमांक 44 मधील चौथी जागा हि थेट महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.