कल्याण
कल्याण डोबिवली महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या ७ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत. शासनमान्य अधिकृत शाळेत प्रवेशासाठी या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये सनवेल इंग्लिश स्कूल, अटाळी, आंबिवली (प), लिटिल वंडर प्रायमरी स्कूल, मांडा टिटवाळा, स्मॉल वंडर प्रायमरी स्कूल, कल्याण (प), दि. बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल, बिला कॉलेज रोड, कल्याण (प), इकरा इंग्लिश स्कूल, सर्वोदय सृष्टी, कल्याण (प), स्काय एन्जल नॅशनल स्कूल, बल्याणी, अॅपॉस्टॉलिक इंटरनॅशनल स्कूल, मांडा टिटवाळा या इंग्रजी शाळांचा समावेश असल्याची माहिती कल्याण डॉबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी दिली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर