December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

यंग स्टार युथ फाऊंडेशनने केला कल्याणकरांचा सन्मान

कल्याण

यंग स्टार युथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कल्याण सन्मान महोत्सव सम्पन्न झाला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. “जे आहे कल्याणची शान, आम्ही करतो त्याचा सम्मान” हा उपक्रम शेवटच्या दिवशी राबवत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कल्याणमधील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

या महोत्सवाबाबत यंग स्टार युथ फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश चंद्रकांत भोईर म्हणाले की, कोरोनाच्या काळात दोन वर्षांपासून सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख होते. विविध क्षेत्रातील कलाकारांना काम न मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थितीही ढासळली होती. अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीत यंग स्टार युथ फाऊंडेशनने पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना, त्यात घरपोच सिलेंडरवाला, एमुबल्सवाला ड्रायवर, स्मशानात काम करणारी महिला, शिक्षिका, डॉक्टर, पत्रकार, पोलिस शिपाई आदींचा सम्मान करण्यात आला.

यावेळी सीने आणि स्टेज़ कलाकार त्यांची कला दाखवण्याची संधी देऊन त्यांचा ही सम्मन करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राची शान म्हटल्या जाणाऱ्या लावणी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर लोकगीते, लोकनृत्य, हिंदी मराठी कवी संमेलन, जादूचे खेळ, फॅशन शो, खेळ पैठणीचा आणि कल्याणमध्ये राहणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करण्यात आला असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.