December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रातील दुकानांवर लवकरच दिसणार मराठी भाषेत फलक

कल्याण

शासनाच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले असून आता महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे.

संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी देवनागरी लिपी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो तथापि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये असे शासनाच्या राजपत्रात नमूद केलेले आहे.

त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी, त्यांच्या प्रभागातील दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक (पाट्या) मराठी भाषेत नसतील तर मराठी भाषेत नाम फलक (पाट्या) लावणेबाबत संबंधितास सुचित करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त यांस देण्यात आलेल्या आहेत आणि याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित दुकानदार/ आस्थापना मालक यांच्यावर विहीत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.