कल्याण
अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार ही कवितेची उर्जा असते आणि आंबेडकरी विचार हीच नवनाथ रणखांबे यांच्या कवितेची प्रेरणा आहे. म्हणूनच आंबेडकरी विचारांचा झेंडा रणखांबे यांच्या ‘प्रेम उठाव’ मधून फडकत असताना दिसतो असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी व्यक्त केले.
कवी कट्टा कल्याण मुंबई आणि शारदा प्रकाशन ठाणे आयोजित ‘जीवन संघर्ष’ कार नवनाथ रणखांबे यांच्या ‘प्रेम उठाव’ या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रा. दामोदर मोरे यांच्या हस्ते कल्याण पूर्वेत झाले यावेळी ते बोलत होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे होते. प्रेम उठाव या पुस्तकात नवीन भाषाशैली आहे म्हणून हे पुस्तक आपल वाटत. प्रेम हा जगाचा पाया आहे. सर्व गोष्टींच्या मुळाशी प्रेम आहे. कवितेचे रसायन हे खूप अप्रतिम आहे. कविता ही जाणिव पूर्वक आणि विचाराने लिहिली जाते असे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रा. विठ्ठल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई यांच्या तर्फे समाजसेवा, उत्कृष्ट पत्रकार, साहित्य सेवा, जीवन गौरव पुरस्कार २०२१-२२ ने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर