वाढदिवस कसा साजरा करावा हे अजय सावंत यांच्याकडून शिकावं – आमदार भोईर
कल्याण
सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी वाढदिवस कसा साजरा करावा हे अजय सावंत यांच्याकडून शिकावं असे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले. अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथआश्रम आणि वृद्धाआश्रमांना अन्नधान्याची तसेच शालेय साहित्याची मदत करण्यात आली यावेळी आमदार बोलत होते.
वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून सावंत यांनी अनाथ मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या मित्र परिवाराने देखील त्यांना साथ दिली. कल्याणमधील युवा समाजसेवक, अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सार्वजनिक आंबेडकर जयंतीचे माजी अध्यक्ष अजय सावंत यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक सस्थांना धान्य स्वरूपात आणि शालेय साहित्य देऊन मदत केली. अशा प्रकारे अनाथ आश्रमाला आणि वृद्धा आश्रमाला अजय सावंत यांनी मदत करून तरुणांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या सामाजिक संस्थांमध्ये राईट्स ऑफ वुमेन संचालित आईची सावली बालभवन, हेल्पिंग हॅण्ड सामाजिक संस्था, डॉ. रवींद्र जाधव यांची वृद्धांसाठी आणि अनाथांसाठी काम करणारी डॉ. मित्र चॅरिटेबल ट्रस्ट, रेल्वे स्टेशन व परिसरातील बाल भिक्षेकरी मुलांसाठी शैक्षणिक निवासी प्रकल्प राबविणारी खडवली येथील पसायदान बालविकास फाउंडेशन, बापगाव येथील मैत्रकुल संस्था, वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशन, कर्तव्य आश्रम ठाणे, बालजीवन टिटवाळा, साई सेवा वृद्धाश्रम ठाणे, ममता विकास संस्था, निवारा केंद्र संस्था कल्याण आदी संस्थाना मदत करण्यात आली.
वाढदिवसाच्या दिवशी आर्थिक उधळपट्टी करीत वाढदिवस साजरा करणारे अनेक जण असतात पण अनाथ बालकांच्या आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनंद फुलविणारे फारच कमी असतात. या अनाथ बालकांच्या चेहऱ्या वरील हास्य फुलवीत आपला वाढदिवस साजरा झाल्याने आपल्यालाही तेव्हढेच समाधान झाल्याचे या वेळी अजय सावंत यांनी सांगितले.
यावेळी सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, अखील भारतीय कोळी समाज उपाध्यक्ष मारुती पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, भाजपाच्या प्रिया शर्मा, ज्योती भोईर, रिपाईचे दयाल बहादुरे, बाळाराम कराळे, मनसेच्या शितल विखणकर, प्रो. डॉ. संदीप भालेराव, बाळाराम भालेराव, अनिल धनगर, संतोष जाधव, सतीश बनसोडे, जगदीश धुमाळ, राम म्हात्रे, नरेश पाटील, बंटी परदेशी आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर