December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेचा केडीएमसीवर मोर्चा

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदानातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसेचे नेते आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, माजी आमदार प्रकाश भोईर, संघटनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, गणेश खंडारे, शहर संघटक रुपेश भोईर आदी पदाधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी मनसेने नेते देशपांडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. महापालिकेतील कंत्रटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. कोरोना काळात काम केलेल्या कामगारांना भत्ता दिला गेला नाही. तसेच कोरोना काळात काम करीत असताना निधन झालेल्या कामगारांना सुरक्षा कवचाची रक्कम मिळालेली नाही. या विविध मुद्यावर देशपांडे यांनी चर्चा केली. या चर्चेला आयुक्त उपस्थित नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

अतिरिक्त आयुक्त पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत किमान वेतन आणि फरकाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याचे मान्य केले आहे.