December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निसर्गोत्सवाचे केडीएमसीने केलंय आयोजन

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त आगळ्य़ा वेगळ्य़ा दोन दिवसीय निसर्गोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

‘माझी बाग, माझा परिसर’ या विषयाच्या अनुषंगाने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या 3 स्पर्धकांना 5 जून रोजी सकाळी 10 वाजता स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सहभागी स्पर्धकांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून तसेच विविध सामाजिक संस्थाकडून प्राप्त झालेल्या सायकली महापालिकेच्या शाळांमधील गरजू विदयार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत भव्य अशा “कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२ प्रदर्शनाचे” 5 आणि 6 जून राेजी आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनाशुल्क खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, स्वयंपाक घरातील कच-यापासून खत निर्मिती, विविध आयुर्वेदिक रोपांची माहिती, लँडस्केप ट्रे, किचन गार्डनिंग या विषयी माहिती तसेच महापालिका परिक्षेत्रातील निवडक नर्सरीकडून विविध रोपांची माहिती व स्वस्‍त दरात विक्री असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच या दाेन दिवसात सायंकाळी 5 ते 6 व 6 ते 7 या कालावधीमध्ये पर्यावरणातील तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

तरी महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी “कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२” मधे सहभागी होऊन महापालिकेतील हरित प्रदर्शनाला व विविध कार्यक्रमांना जास्तीत जास्त प्रतिसाद दयावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.