क्रिकेट स्पर्धेत मुंबई-बी संघ विजयी
नाशिक क्षेत्र संघ ठरला उपविजेता
मुंबई
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने २१ व्या ब्रम्हर्षी व्यासदेवजी मेमोरियल ट्राफी क्रिकेट स्पर्धेची ५ जून रोजी यशस्वी सांगता झाली.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रीय सामन्यांतून राज्यस्तरावर एकंदर १२ संघांची निवड झाली होती. दिनांक ४ व ५ जून रोजी नारंगी विरार येथे या संघांमध्ये सामने खेळवण्यात आले आणि यातील मुंबई-बी संघ व नाशिक संघामध्ये अंतिम सामना झाला. मुंबई-बी संघ ९ गडी राखून अंतिम विजयी झाला व ट्रॉफीचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ४ जून रोजी संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज विनोद वोहरा (सेवादल व दूरदेश विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मेंबर इंचार्ज विनोद वोहरा व मोहन छाब्रा (मेंबर इंचार्ज प्रशासन विभाग) यांनी अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी करुन स्पर्धेला सुरुवात केली. याप्रसंगी महेश मांगेला (एन.सी.सी. ग्राउंड अध्यक्ष), कांताताई पाटील (माजी नगराध्यक्षा), काशिनाथ पाटील (अध्यक्ष आई एकविरा चॅरिटेबल ट्रस्ट) आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शविली. तसेच मंडळाचे जनार्दन पाटील जी (झोनल प्रमुख- नाशिक विभाग) , विविध विभागाचे क्षेत्रीय संचालक उपस्थित होते.
वोहरा जी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना हार-जीत यांच्या पलीकडे जावून खिळाडू वृत्तीने खेळाचा मनमुराद आनंद लुटावा असे सांगितले. खेळ हा मनवीय संबंध प्रेम पूर्ण करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या सामन्यांचे आयोजन करण्यामध्ये मिशनच्या महाराष्ट्र स्पोर्ट कमिटीचे अध्यक्ष बळीराम कासारे आणि अन्य सदस्य तसेच मंडळाच्या नाशिक झोनचे प्रभारी जनार्दन पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. जनार्दन पाटील (झोनल प्रमुख- नाशिक विभाग) आणि ललित दळवी (क्षेत्रीय संचालक) यांच्या हस्ते विजेता संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच उपविजेता संघ व इतर संघांना पारितोषिके वितरित करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर