December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

२०८ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

ठाणे 

संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन वागळे इस्टेट, सेक्टर २०, किसननगर, ठाणे येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २०८ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई मार्फत करण्यात आले.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या समर्पित भावाने मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देणाऱ्या शिकवणूकीनुसार वागळे इस्टेट व किसननगर परिसरातील निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, वागळे इस्टेट पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, पोलिस कर्मचारी जालाराम गावित, समाजसेवक विनोद जाधव, शाखप्रमुख अशोक यादव, उपविभाग प्रमुख अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे आणि निष्काम समाज सेवेचे कौतुक केले.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक सुभाष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुखी आणि सेवादल अधिकारी तसेच जवळपासच्या सेक्टरचे संयोजक व स्वयंसेवक तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.