कल्याण
महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. राज्यातील रास्तभाव रेशन दुकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील रास्तभाव दुकानांमधून भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरता परवानगी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी त्याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. राज्यात ५० हजारांहून अधिक रास्तभाव दुकाने आहेत. केवळ अन्नधान्यांच्या विक्रीवर अवलंबून असणा-या या दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध वस्तू, उत्पादने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादन कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव शिधावाटप दुकानांमधून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानगी देण्याचे सरकारने ठरवले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर