December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

@Facebook

दरीत उडी मारून एसटी वाहकची आत्महत्या

मुरबाड

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाट दरीत गणपत इडे या एसटी वाहकाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ते भंडारदरा येथे कुटूंबासह राहत होते.

कल्याण ते अकोले ही अकोले एसटी आगरची बस आज दुपारच्या सुमारास कल्याणहून नगर जिल्ह्यातील अकोले बस आगरमध्ये निघाली होती. त्यातच याच एसटीत वाहक म्हणून गणपत कार्यरत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास एसटी बस माळशेज घाट चढत असतानाच वाहक गणपत यांनी अचानक घाट दरीत उडी घेतली. घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहकाचा मृतदेह शोधून उत्तरणीय तपासणीसाठी मुरबाडमधील शासकीय रुग्णालयात रवाना केला.

मात्र, वाहक गणपत यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.