December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपचाच महापौर : कांबळे

राज्यसभा निवडणूक निकालानंतर कल्याणमध्ये भाजपाचा जल्लोष

कल्याण

महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड घवघवीत यश मिळाल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने जल्लोष करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करून कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटून, फटाके वाजवून, गुलाल उधळून भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

लोकांच्या मनामध्ये जे होते ते महाराष्ट्रात झालं असून लोकांच्या मनातला निर्णय झाला आहे. जनता या सरकारला पूर्णपणे कंटाळली आहे. हे सरकार म्हणजे अस्ताव्यस्त सरकार असून केवळ सरकार वाचवण्यासाठी यांची धडपड सुरू असते. हे जनतेला आता लक्षात आले असून आगामी कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या निवडणूकीत भाजपचाच महापौर होणार हे शंभर टक्के असा दावाही जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे नेतृत्वाखाली प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष नंदू परब, संजय मोरे, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, माजी नगरसेवक मनोज राय, प्रिया शर्मा, प्रिती दिक्षित, सुधीर भगत, शत्रुघ्न भोईर, दिपक दोरलेकर, तेजस केंबारे, नितेश म्हात्रे, सौरभ गणात्रा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.