माहिती घेण्यासाठी मारायला लावल्या फेऱ्या
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत अनधिकृत फलक लागलेले नेहमीच दिसत असतात. प्रामुख्याने त्यात राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे तर जाहिराती म्हणून लावलेले फलक असतात. अश्या लावलेल्या फलकांची कोणतीही परवानगी ही महानगरपालिकेकडून घेतली जात नाही त्यामुळे अश्या अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येतं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी शहरात लागणाऱ्या अनधिकृत फलकांवर थेट गुन्हे नोंद करून फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश काढलेले असतांना देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजवर एकही अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर गुन्हा नोंद करून फौजदारी कार्यवाही केली नाही अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ता भूषण पवार यांनी केलेल्या अर्जातून उघड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांवर गुन्हे नोंद करावे असे आदेश दिले होते, तरीही शहराच्या हद्दीत अनधिकृत फलकांचा सुळसुळाट असतांना देखील आजवर महानगरपालिकेने एक ही गुन्हा नोंद न करून अनधिकृत फलकांना महानगरपालिकेचे अभय आहे का असे प्रश्न निर्माण झाला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते आणि शहरातील जागरूक नागरिक भूषण पवार यांनी महानगरपालिकेकडे ११ एप्रिल रोजी महानगरपालिका हद्दीत आजवर अनधिकृत फलकांवर किती गुन्हे नोंद केले म्हणून माहिती मागविली होती. ३० दिवसांत संबंधित अर्जाचे उत्तर अपेक्षित असतांना देखील महानगरपालिकेने १० प्रभाग ऐवजी ५ प्रभागांची माहिती उपलब्ध करून इतर ५ प्रभागांची माहिती दिली नाही उलट महानगरपालिकेने अर्जदार भूषण पवार यांनाच महानगरपालिकेच्या दहा प्रभागात चौकशी करावी आणि माहिती घ्यावी अशी अजब उत्तरं देऊन स्वजबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
संबंधित अर्जा बद्दल माहिती अर्धवट दिली असल्याने महानगरपालिकेकडे प्रथम अपील करून उर्वरित माहिती घेणार आहोत त्याच सोबत गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ही राज्य माहिती अधिकार आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर