कल्याण
लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या मैत्रिणीच्या मदतीने सात तरुण संबंधित तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकरणी तिच्या मैत्रिणीस आठ जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या तरुणीने बारावीची परीक्षा दिली होती. नुकताच तिचा निकालही आला होता. तिच्या आत्महत्येनंतर कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या सात जणांना एक तरुणी मदत करत होती. ही तरुणी पीडितेची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू