December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

असा साजरा झाला ‘योगेश’चा वाढदिवस

कल्याण

कोरोनामुळे निधन झालेल्या योगेश उल्हास जामदार याचा वाढदिवस त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने साजरा केल्याचे पाहायला मिळाले. डंपिंग ग्राउंडवर राहणाऱ्या मुलांना शालेय साहित्य आणि आर्थिक मदत करत सामाजिक भान ठेवून हा उपक्रम घेण्यात आला.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात योगेश याचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले होते. दिव्यांग असूनही मनाने मात्र, अत्यंत खंबीर आणि अतिशय मनमिळाऊ, एक हसतमुख, सर्वाँच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असे योगेश याचे व्यक्तीमत्व होते. त्याचा आजचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून त्याला आदरांजली वाहण्याचा मानस त्याचे वडील उल्हास जामदार यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी पुढाकार घेत डंपिंग ग्राऊंडवरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविला.

यावेळी योगेशच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित चिमुकल्यांनीच केक कापला. त्यानंतर उपस्थित कुटुंबिय आणि उपस्थितांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.