पनवेल
होप मिरर फाउंडेशन संस्था ही विविध उपक्रम हाती घेत असून, गरीबांना मदतीचा हात असते. या होप मिरर फाउंडेशन संस्थेचा द्वितिय वर्धापन दिन पनवेल येथिल पेंदर परमशांती धाम वृद्धाश्रमातील आजी, आजोबांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.
यावेळी होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या नावाने परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आबानंद महाराज, होप मिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमजान शेख यांच्या समवेत आजी, आजोबांसोबत केक कापण्यात आला. होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या वतीने वृद्धाना फळे वाटप करण्यात आली.
होप मिरर फाउंडेशन संस्था विविध ठिकाणी पोहचत असून उत्तम सामाजिक काम करत आहेत. आणि यापुढे त्यांनी असेच काम करत रहावे असे यावेळी परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आबानंद महाराज यांनी सांगितले.
होप मिरर फाउंडेशन संस्थेला दोन वर्ष पूर्ण होत असून तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत. म्हणूनच आजी, आजोबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या वतीने फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे होप मिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमजान शेख यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी होप मिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमजान शेख, परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आबानंद महाराज, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अभय वाघ, रवी चौगुले, कवी मिलिंद जाधव, रुबिना खान, आशिष कदम, तुषार पोरजी उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह