December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेला बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न पुरस्कार

कल्याण

कल्याण मधील सामजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेला बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल आहे. नाशिक येथील दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्याची नोंदणी महिनाभरापूर्वी पासून चालू होती त्यासाठी संस्थेचे कार्य व माहिती पाठवायची होती. त्यानुसार सर्व पडताळणी करून निवड कऱण्यात येणार होती आणि त्याप्रमाणे कल्याणमधील आपल्या हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेची निवड करण्यात आली.

रविवारी नाशिक येथील कालिदास कलामंदिर नाट्यमंदिरात हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेला बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार संस्थापक सचिन राऊत आणि सभासद संकेत गाडेकर यांनी स्वीकारला. या पुरस्कारचे श्रेय आत्तापर्यंत संस्थेला सहकार्य आणि मदत करणाऱ्या दानशूर नागिरकांचे असून त्यांच्या मदतीच्या हाताशिवाय हे कार्य शक्य नसल्याची प्रतिक्रिया सचिन राउत यांनी दिली.