डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर परिसरात १७ ठिकाणी आयोजन
कल्याण
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादांनी संत निरंकारी मिशन मार्फत यावर्षी मानवतेला समर्पित ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’चे आयोजन संपूर्ण भारतवर्षातील विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आले. यासाठी स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सत्संग भवनांमध्ये, मोकळ्या जागांवर तसेच उद्यानांमध्ये ही योग शिबिरे आयोजित करण्यात आली.
डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर परिसरामध्ये एकंदर १७ ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, गोग्रासवाडी, सोनारपाडा, ठाकुर्ली, भिवंडी, ब्राह्मण आळी, द्वारली पाडा, टिटवाळा, भिसोळ, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, वाशिंद, कसारा व विठ्ठलवाडी आदि ठिकाणांचा समावेश होता. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात एकंदर ४० ठिकाणी या योग शिविरांचे आयोजन करण्यात आले. तज्ञ योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरांमध्ये निरंकारी भक्तगण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आणि त्यांनी योगाभ्यास केला. या व्यतिरिक्त डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर पट्ट्यामध्ये १७ ठिकाणी अशाच योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सर्व योग शिबिरांचा प्रारंभ ईश स्तवनाद्वारे करण्यात आला.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अनेकदा आपल्या विचारांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याची प्रेरणा देत असतात. या योग दिवसाचा उद्देशही हाच आहे, की सर्वांमध्ये एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेचा संचार व्हावा, ज्यायोगे हे जीवन आणखी सुंदर व उत्तम रीतीने जगता येईल. मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१५ पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात करण्यात आले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर