Power by The Web Cloud Media

प्रशिक्षकपदी प्रशांत चव्हाणची नियुक्ती

कल्याण

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने अमेच्युअर कबड्डी असोसिएशन हरयाणा यांच्यावतीने २१ जुलै ते २४ जुलै या कालावधीत ६९ वी पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा चरखी दादरी, हरयाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरूष गट प्रातिनिधीक संघाच्या प्रशिक्षकपदी कल्याण मधील कबड्डीपटू प्रशांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

६९व्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष खेळाडूचे सराव शिबीर १ ते १७ जुलै पासून सुरू होणार असून, १९ जुलै रोजी महाराष्ट्राचा हरयाणा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबई येथुन रवाना होणार असल्याची माहिती सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *