December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विद्यार्थ्यांनी घेतली स्मार्ट सिटी कामाची माहिती

स्मार्ट सिटी अभियानाच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

कल्याण

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर येथे महापालिकेच्या शाळेच्या तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर मार्फत शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनकोनातून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही, वाहतूक सिग्नल यंत्रणा, ई-चलन प्रणाली आदींचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने कसे चालते यावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी एस.के.डी.सी.एल. चे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत भगत, व्यवस्थापक घनश्याम भाबड, कडोंमपा अधिकारी, स्मार्ट सिटी कार्यालयाचे अधिकारी वर्ग, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, शाळेचे व कॉलेजचे शिक्षक आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील मौजे-गौरीपाडा येथे स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉ. लि. अंतर्गत सिटी पार्क प्रकल्पात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचे निमित्त साधून ७५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकही वृक्षारोपण कार्यक्रमात हिरीरीने सहभागी झाले. सुमारे ३२ एकर जागेत एक परिपूर्ण सिटीपार्क शहरातील नागरिकांसाठी उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.