कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे 40 एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या उदयानात एकाच ठिकाणी फुलपाखरु उदयान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उदयान, मेडीसिनल प्लांट पार्क अनोखे आहेत. आज कृषी दिन व डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई-एमसीएचआय आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जैवविविधता पार्कमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम साजरा केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व महापालिका शाळांचे विदयार्थी, आय नेचर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर