December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

साई इंग्लिश हायस्कूलची परंपरा यंदाही कायम

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव

कल्याण

दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश हायस्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. आज या शाळेतील १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव देखील करण्यात आला.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे साई एज्युकेशन सोसायटी संचालित साई इंग्लिश हायस्कूल असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा आदी क्षेत्रात विद्यार्थी निपुण व्हावे हा शाळेचा मानस आहे. यामुळेच शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल दरवर्षी १०० टक्के लागत आहे. यावर्षी शाळेतील २२१ विद्यार्थी उच्च श्रेणीमध्ये तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

देवांगी महाडिक या विद्यार्थिनीने ९५.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून अंजना नेडीयड या विद्यार्थिनीने ९४.२० टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर बुशरा शेख, सोनल सुकटणकर, ज्ञानेश्वरी नेहरकर या विद्यार्थिनीनी ९३.२० टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. आज या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

यावेळी शाळेच्या जनसंपर्क अधिकारी मैथिली मूर्ती, सीईओ श्रीलक्ष्मी, विश्वस्त रमेश चव्हाण, दिपक पाटील, मुख्याध्यापक एम. जे. राठोड, उपमुख्याध्यापक गौतम घायवट, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्र संचलन मनी कोणार यांनी केले.