December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आरटीओ पासिंग ट्रॅक येथे पोलीस गस्त ठेवण्याची मागणी

कल्याण

पूर्वेतील नांदिवली आरटीओ पासिंग ट्रॅक परिसरात महिला विद्यार्थीनी यांची छेडखानी, सुरक्षा, विपरीत घटना टाळण्यासाठी सांयकाळी दोन पोलिस अमलदार बंदोबस्तासाठी नेमणुक करून पोलीस गस्त ठेवण्याची मागणी स्थानिकांनी कोळसेवाडी पोलिसांकडे केली आहे.

कोळसेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील नांदिवली तलाव आरटीओ पासिंग ट्रॅक परिसरात लोक वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर शालेय शिकवणी क्लास असल्यामुळे विद्यार्थीनी राञी येथून येतात जातात. तसेच नोकरदार महिला गृहिणींचा देखील वावर असतो. या परिसरात रात्री आरटिओ ट्रॅक मैदानावर असमाजिक तत्वे अपप्रवुअती यांचा मोठा उपद्रव वाढलेला आहे. अपप्रवृत्ती यांनी तिथे दारु, गांजा, गर्दा पिण्याचा अड्डा बनविला आहे. यामुळे नाहक महिलांची कुचंबणा होत आहे. उलटसुलट विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वेळीच दखल घेऊन प्रतिबंध कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

या परिसरात चौकी नाही काही विपरीत घटना घडली तर पोलिसांना खबर जायला विलंब होतो. पोलिस स्टेशन व उपलब्ध पोलिस चौकी लाबं आहे. कायमस्वरूपी गस्तीसाठी पोलिस अमंलदार यांची नेमणूक करण्याची मागणी नागरिक करत आहेत. वास्तविक पाहता येथे नविन पोलिस चौकीची आवश्यकता आहे. याठिकाणी गावगुडांनी हैदोस घातला आहे. पांसिगला येणाऱ्या ट्रक टेम्पो चालकांकडुन नित्यरोज हप्ता वसुली केली जात आहे. पंरतू राजकीय हस्तक्षेप व अर्थपुर्ण संबंधामुळे पोलिस प्रशासनाकडुन दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.