नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
कल्याण
शहरातील स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था यांचेकडे प्राध्यान्याने लक्ष पुरविणार असे प्रतिपादन नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचेकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.
महापालिकेतील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वच्छतेबरोबरच अनधिकृत बांधकामे, पाणी पुरवठा, मलनि:सारण या बाबींवरही कटाक्षाने लक्ष दिले जाईल, असेही ते पुढे म्हणाले. शासनाकडून ६७ वेलनेस सेंटर्स महापालिकेला मंजूर झाली आहेत, ही सेंटर्स सुरु झाल्यावर आरोग्य व्यवस्था आणखी सुरळीत होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यापूर्वी उपआयुक्त, (महसूल) कोकण विभाग, नवी मुंबई, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे इ. अनेक महत्वाच्या ठिकाणी पदभार भुषविला आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर