December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी आयुक्तांनी केला पाहणी दौरा

पाहणी दौ-यात कामचुकार आढळलेल्या कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई

कल्याण

केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी सकाळी कल्याणमधील हजेरी शेड्सची पाहणी केली. आयुक्तांच्या निर्देशानुसार कामात हलगर्जीपणा करणा-या “क” प्रभागातील एक स्वच्छता अधिकारी आणि एक प्रभारी मुकादम यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी आयुक्तांनी कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील एकंदर स्वच्छतेची पाहणी केली आणि संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.

आज सकाळी डोंबिवलीच्या फ प्रभागातील पाथर्ली हजेरी शेडला भेट देऊन आयुक्त डॉ. दांगडे यांनी या हजेरी शेडवर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची व्यक्तिश: पाहणी केली. तद्नंतर आयुक्त डॉ.दांगडे यांनी डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन तेथील ऑपरेशन थिएटर, अपघात कक्ष, मेल वॉर्डची पाहणी करुन तेथे कर्तव्यावर असलेले वैदयकीय अधिकारी डॉ.संतोष केंभवी यांच्याकडून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या.