December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे

– महापालिका अति.आयुक्त सुनिल पवार

कल्याण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सगळयांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आज केले. “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाची जनजागृती महापालिका परिसरातील घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविदयालये यांचे समवेत संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

या बैठकीस महापालिका सचिव संजय जाधव, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, बिर्ला महाविदयालय, मॉडेल महाविदयालय, सोनवणे महाविदयालय, साकेत महाविदयालय, टिळकनगर ज्यु. कॉलेज, प्रगती महाविदयालय, नेरुरकर महाविदयालय, के. एम. पटेल महाविदयालय, ॲचिवर्स महाविदयालय, मुथा महाविदयालय, अग्रवाल महाविदयालय, रॉयल महाविदयालय, ग्लोबल महाविदयालय, वंदे मातरम महाविदयालय, जनगनमन ज्यु. कॉलेज, महिला समिती ज्यु. कॉलेज आदी महाविदयालयांचे तसेच शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार ध्वजसंहितेचे पालन करुनच सर्वांनी झेंडा फडकवायचा आहे. याबाबत वेळोवेळी महानगरपालिकेमार्फत सुचना सर्वांना दिल्या जातील, महापालिकेच्या बी.एल.ओ. मार्फत यासंदर्भातील जनजागृती व ध्वजाचे वितरण करण्यात येणार आहे. हे ध्वज अत्यल्प किंमतीत महापालिकेची प्रभाग कार्यालये आणि कल्याण मधील ३८ व डोंबिवली मधील ६८ स्वस्त धान्यांच्या दुकानातही विक्री साठी उपलब्ध राहतील. झेंडयासमवेतच पालन करावयाच्या माहितीचे माहितीपत्रक सोबत पुरविले जाईल अशी माहिती अति.आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

महाविदयालयांच्या एनसीसी व एनएसएसच्या कॅडेट मार्फत संचलन केल्यास या उपक्रमाच्या वातावरण निर्मितीस मदत होईल अशी माहिती महापालिका सचिव संजय जाधव यांनी यावेळी दिली असता उपस्थित महाविदयालयांच्या प्रतिनिधिंनी त्यास उस्फुर्त प्रतिसाद दिला. महाविदयालयातील या मुलांना घरोघरी तिरंगा याबाबत जनजागृती करण्याकामी महापालिकेतर्फे तिरंगा स्वयंसेवक असे ओळखपत्र दिले जाईल अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.